Skip to content

Latest commit

 

History

History
51 lines (33 loc) · 8.52 KB

localisation.md

File metadata and controls

51 lines (33 loc) · 8.52 KB

भाषांतर (Language localisation)

अनेक मुक्त स्त्रौत (औपन सौर्स) सॉफ्टवेअर हे इंग्रजी भाषेत असतात. ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांना ते वापरायला येत नाही किंवा वापरायला अवघड जाते. अश्या वेळी हे सॉफ्टवेअर जर मराठी भाषेत वापरायला मिळाले तर सोयीचे ठरते.

इंग्रजी सॉफ्टवेअर, माहिती इत्यादींना दुसऱ्या भाषेत भाषांतर करून ते वापरायला उपलब्द करून देण्याच्या प्रक्रियेला इंग्रजीत "localisation" असे म्हणतात.

खालील सारणीत भाषांतर करता येतील असे काही सॉफ्टवेअर अनुप्रयोग नमूद केले आहेत -

अनुप्रयोगाचे नाव उपयोग वापरण्याचा/शिकण्याचा फायदा एकूण भाषांतर शब्द संख्या मराठी भाषांतराचे पूर्णत्व दुवे टीप
अर्दुईनो आय.डी.ई. (Arduino IDE) अर्दुईनो साठी सॉफ्टवेअर विकास प्रणाली विद्युत(इलेक्ट्रॉनिक) उपकरणांसाठी सॉफ्टवेअर आज्ञावली (कोड) विकसित करता येईल ३,१८७ ११.८६ % transifex
अर्दुईनो सायन्स जर्नल (Arduino Science Journal) स्मार्टफोन मधील विविध सेन्सर्समधून माहिती संकलन भौतिकशास्त्र/अभियांत्रिकी प्रकल्पांच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल शोध चालू शोध चालू शोध चालू
स्टेलारियम (Stellarium) संगणक व फोने वरील तारांगण खगोलशास्त्रातील अभ्यास, आकाश निरीक्षण व प्रकल्पांसाठी उपयुक्त ठरेल ३०,१३४ ६.४७ % transifex फक्त मुख्य प्रकल्प
जिट्सी मीट (Jitsi Meet) संगणक व फोने वरील वेब मीटिंग अनुप्रयोग विना खाते व सुरक्षितपणे वेब मीटिंग घेता येईल - १०० % (टीप वाचा) github काही अनुवाद सुधारले जाऊ शकतात

हे सोडून "ओपन स्ट्रीट मॅप" (openstreetmap), थोडक्यात OSM, नावाचा एक अनुप्रयोग ज्याबद्दल विशेषतः मी उल्लेख करू इच्छितो. हे म्हणजे गूगल मॅप्स सारखे, पण "मुक्त माहिती" (ओपन डेटा) वापरून तयार केलेले, भौगोलिक नकाशे. ह्या बद्दल संविस्तार माहिती मी वेगळ्या लेखात नंतर देईन. हे नकाशे तयार करायला वापरले जाणारे काही अनुप्रयोग मी खाली दिले आहेत. हे अनुप्रयोग पण मुक्त स्त्रोत असल्याने ते देखील आपण भाषांतर करू शकतो.

अनुप्रयोगाचे नाव उपयोग वापरण्याचा/शिकण्याचा फायदा एकूण भाषांतर शब्द संख्या मराठी भाषांतराचे पूर्णत्व दुवे टीप
ओ.एस.एम. आय.डी एडिटर (OSM iD editor) OSM साठीचा ब्राउझर मधील नकाशा संपादक तुमचे गाव, नगर इत्यादींचे नकाशे संपादित करू शकतो ७,१४९ ०.०० % transifex
जे.ओ.एस.एम. (JOSM) OSM संपादनासाठीचे सांगणातील बहुकार्य साधन OSM iD पेक्षा जास्त चांगल्यारितीने नकाशे संपादित करू शकतो १२,८०४ ३१.६१ % JOSM, Launchpad फक्त मुख्य प्रकल्प
ओ.एस.एम. अँड (OsmAnd) स्मार्टफोन वरील OSM नकाशे संपादन व विना इंटरनेटचा वापर फोने वरून जी.पी.एस. (GPS) वापरून सटीकरित्या नकाशे संपादित करू शकता (उदा. शेतीची, जमिनीची सीमारेषा वगैरे) ३८,३८८ २८.०० % weblate सगळे उपप्रकल्प एकत्रित.

ह्या सॉफ्टवेअर अनुप्रयोगांमध्ये भाषांतर करण्यासाठी आपल्याला त्यांच्या भाषांतर प्रकल्पामध्ये आपले खाते उघडून तिथे योगदान करता येते. भाषांतर कसे करता येईल, त्याची प्रक्रिया काय असते, भाषांतर प्रकल्पांचे दुवे इत्यादी वर भविष्यात अधिक माहिती इथे जोडली जाईल.

ह्या पानावरची माहिती वेळोवेळी अद्ययावत केली जाईल.

काही मदत लागल्यास, किंवा अभिप्राय देण्यासाठी आपण इथून संपर्क करू शकता.


<English section>

Same table as above for reference -

Application name Use Benefit of learning/using Translation total word count Marathi translation completion
Arduino IDE Development environment for Arduino Can develop software for electronics TBD TBD
Arduino Science Journal Mobile app to collect information from sensors in your mobile phone Useful in physics and engineering projects TBD TBD
Stellarium a planeterium for computer and mobile phone Useful for astronomy studies, observation and projects TBD TBD
Jitsi Meet web meeting application for computer and mobile phone Can conduct web meeting securely without creating an account TBD TBD
OSM iD editor Open Street Map's in-browser editor Can create maps for your village, town, city etc. TBD TBD
JOSM Multi function desktop tool for OSM Can create more detailed maps than iD editor TBD TBD
OsmAnd Maps Offline maps for mobile phone based on OSM Can use GPS from phone for mapping places like plots, farms etc. TBD TBD

TBD - To be decided/determined